‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा टेलिव्हिजन शो अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. चाहत्यांना या शोशी निगडित सर्व पात्रे आवडतात. अलीकडेच या शोमध्ये अंजली भाभीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने शोच्या निर्मात्यांवर तिचे मानधन न दिल्याचा आरोप केला होता. गेल्या 12 वर्षांपासून ती या शोचा भाग होती आणि काही दिवसांपूर्वी तिने शो सोडला. त्याच वेळी, आता शोच्या निर्मात्यांनी अधिकृत निवेदन जारी करून अभिनेत्रीचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
TMKOC : ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांनी फेटाळले नेहा मेहताचे आरोप, कारवाईचा सोबतच दिला सबुरीने घेण्याचा इशारा
वास्तविक, नेहा मेहताने शोच्या निर्मात्यांवर आरोप केला होता की तिचे सहा महिन्यांचे मानधन दिलेली नाही. तिने शोच्या निर्मात्यांना अनेकदा फोन करून थकीत मानधन देण्याबाबत बोलले. मात्र अद्यापपर्यंत तिला मानधन मिळालेले नाही. त्याच वेळी, आता शोच्या निर्मात्यांनी तिचा आरोप फेटाळून लावला आहे आणि तिला खोटारडे म्हटले आहे. असा दावा करण्यात आला आहे की प्रॉडक्शन हाऊसने नेहाशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने अद्याप औपचारिकता पूर्ण केलेली नाही.
निर्मात्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आमच्या कलाकारांना आमचे कुटुंब मानतो. सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहाला अनेक वेळा फोन केला, पण ती आतापर्यंत बाहेर पडण्याच्या कागदपत्रावर सही करण्यास टाळाटाळ करत आहे. नेहाच्या स्वाक्षरीशिवाय आम्ही कंपनीच्या धोरणानुसार अंतिम तोडगा काढू शकत नाही.
ते पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून तिने आम्हाला उत्तर देणेही बंद केले आहे आणि आम्हाला न भेटताच तिने शो सोडला. नेहाने निर्मात्यांवर खोटे आरोप करण्याऐवजी आमच्या ईमेलला उत्तर द्यावे अशी आमची इच्छा आहे. या शोने तिला 12 वर्षे प्रसिद्धी मिळवून दिली. आम्ही योग्य कारवाई करण्याचा आमचा अधिकार राखून ठेवला आहे.