Pakistan Economic Crisis : पै-पैला मोहताज झाला पाकिस्तान, आता ‘चहा’वरही कंजूषी, मिळणार फक्त ‘सत्तू’


इस्लामाबाद – पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. शुक्रवारी येथील शेअर बाजार दोन हजार अंकांच्या घसरणीनंतर कोसळला. यानंतर बाजाराला आपला व्यवसाय बंद करावा लागला. दुसरीकडे, आर्थिक संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तान सरकारने श्रीमंतांसाठी 10 टक्के सुपर टॅक्स जाहीर केला आहे.

दरम्यान, पैसे वाचवण्यासाठी पाकिस्तान सरकारने एक नवीन आणि अनोखा मार्ग काढला आहे. पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने सर्व विद्यापीठांना ‘चाय’ ऐवजी ‘लस्सी’ किंवा ‘सत्तू’ या स्थानिक पेयाचा प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामागील तर्क असा आहे की यामुळे केवळ रोजगारच वाढणार नाही, तर देशात रोजगार वाढेल आणि लोकांसाठी उत्पन्नही मिळेल.

स्थानिक चहाच्या बागांना दिले पाहिजे प्रोत्साहन
पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने विद्यापीठांना स्थानिक चहाच्या बागांना प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. यासोबतच लस्सी आणि सत्तूलाही प्रोत्साहन द्यायला हवे. त्यामुळे चहाच्या आयातीवर होणारा खर्च वाचेल आणि रोजगारही निर्माण होईल.

उधारीवर चहा मागत आहे पाकिस्तान
खरं तर, पाकिस्तानच्या नियोजन मंत्र्यांचा व्हिडिओ समोर आल्यावर पाकिस्तान उच्च शिक्षण आयोगाने असा सल्ला दिला आहे. या व्हिडिओमध्ये ते देशातील जनतेला चहाचे सेवन कमी करण्याचे आवाहन करत आहेत. ते म्हणतात की, मी देशाला आवाहन करतो की चहाचा वापर 1-2 कप कमी करा, कारण आपण उधारीवर चहा आयात करतो. पाकिस्तानला उधारीवर चहा विकत घ्यावा लागतो, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. त्यामुळे त्याचा वापर कमी केला पाहिजे.