Maharashtra Crisis : आठवलेंनी घेतली फडणवीसांची भेट, म्हणाले- शिवसेनेच्या बेबनावाशी आपले काही घेणे-देणे नाही


मुंबई – महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले पहिल्यांदाच चर्चेत आले आहेत. शनिवारी ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी आठवले यांच्यासह भाजपचे अन्य नेतेही उपस्थित होते.

फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘शिवसेनेतील भांडणाशी आमचा काहीही संबंध नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपापसातील वाद मिटवतील, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही वाट पाहत आहोत आणि पुढे काय होते ते पाहत आहोत.

सरकार स्थापन करण्याचा विचार नाही
आठवले म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी भाजपचा काहीही संबंध नाही. आम्ही सरकार स्थापन करण्याचा विचार करत नाही. येणाऱ्या काळात काय होते ते बघू. मात्र, त्यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आणि म्हणाले, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आपल्याकडे बहुमत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे अनेक आमदार तुम्हाला सोडून गेले आहेत. शिवसेनेचे 37 आणि 7-8 अपक्ष तुमच्यासोबत नाहीत. मग तुम्ही बहुमताबद्दल कसे बोलू शकता?