१०० षटकार, १०० विकेट, स्टोकची कामगिरी

क्रिकेट या खेळाची लोकप्रियता प्रचंड असून अनेक खेळाडू येथे आले आणि गेले. अनेकानी विविध रेकॉर्ड नोंदवली. पण असे असले तरी कोणत्याही टीम साठी एक अष्टपैलू खेळाडू फार महत्वाचा असतो. क्रिकेट मध्ये आज घडीला असे फक्त दोन फलंदाज आहेत ज्यांनी वनडे, कसोटी मध्ये १०० विकेट आणि १०० षटकार ठोकले आहेत. त्यातील एक खेळाडू विवियन रिचर्ड आता निवृत्त झाले आहेत तर इंग्लंडचा बेन स्टोक अजून खेळतो आहे.

सध्याचा खतरनाक ऑलराउंडर खेळाडू इंग्लंडचा बेन स्टोक्स याने कसोटी क्रिकेट मध्ये फारच चांगली कामगिरी केली असून ८२ टेस्ट मध्ये १०० षटकार आणि १७७ विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये १०० विकेट आणि १०० षटकार ठोकणारा तो एकमेव फलंदाज असून अजूनही तो खेळतो आहे. कसोटी क्रिकेट मध्ये १०० षटकार ठोकणारा तो तिसरा फलंदाज असून त्यापूर्वी ब्रँडन मॅक्कयुलम आणि अॅडम गिलख्रिस्त यांनी ही कामगिरी केली आहे पण आता हे दोघेही क्रिकेट मधून निवृत्त झाले आहेत.

विवियन रिचर्ड यांनी वेस्ट इंडीज कडून खेळताना  असे रेकॉर्ड केले आहे जे आजतागायत मोडले गेलेले नाही. त्यांनी १८७ वनडे मध्ये १२६ षटकार आणि ११८ विकेट अशी कामगिरी केली आहे. वनडे मध्ये १०० सिक्स आणि १०० विकेट हे त्यांचे रेकॉर्ड आजही कायम आहे.