स्पोर्ट्सवेअर नायकेने गुंडाळला रशियातील व्यवसाय

अमेरिकन स्पोर्ट्सवेअर नायके ने रशियातून कंपनी सर्व व्यवसाय बंद करून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. येत्या तीन महिन्यात रशियातील सर्व कारभार बंद केला जात असल्याचे कंपनीने ई मेल च्या माध्यमातून कळविले आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला करून सुरु केलेल्या युद्धाला उत्तर देताना नायकेने रशियात त्यांची दुकाने तात्पुरत्या काळासाठी बंद केली होती मात्र आता रशियातील नायकेच्या मालकीची आणि नायके कडून रशियात संचालित केलेली सर्व दुकाने बंद केली जात आहेत अशी घोषणा गुरुवारी कंपनीने केली आहे.

रशिया युक्रेन युध्द सुरु झाल्यावर यापूर्वी मॅकडोनाल्ड, गुगल या प्रमुख पाश्चिमात्य ब्रांडनी रशियातील व्यवसाय बंद केला आहे. रशियाचे युक्रेनवरील हल्ले अद्यापि सुरु आहेत आणि यामुळे अनेक परकीय कंपन्या रशियाबाहेर पडत आहेत. येत्या काही दिवसात रशियात नवा कायदा आणला जात असल्याची बातमी असून त्यामुळेच रशियातून कंपन्या बाहेर पडू लागल्याचे सांगितले जात आहे. या नव्या कायद्यामुळे कंपन्याच्या समोरच्या अडचणी वाढू शकतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

नायके कडून ई मेल वर दिल्या गेलेल्या माहितीनुसार कंपनीने रशियन बाजार सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्राथमिकता पूर्ण केल्या जात आहेत आणि कर्मचाऱ्याना पूर्ण समर्थन दिले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नायकेच्या महसुलातील फक्त १ टक्का महसूल रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधून मिळत होता.