महान फुटबॉल खेळाडू मेस्सी झाला ३५ वर्षांचा

पॅरीस सेंट जर्मेन कडून खेळणारा महान फुटबॉल खेळाडू लियोनेल मिस्सी याने २४ जून रोजी वयाची ३५ वर्षे पूर्ण केली आहेत. जगातील या महान आणि लोकप्रिय खेळाडूचा जन्म २४ जून १९८७ रोजी अर्जेन्टिना देशातील रोजरियो मध्ये झाला होता. विशेष म्हणजे लहानपणापासून त्याला ग्रोथ हार्मोन कमी असण्याची व्याधी होती आणि त्यावर उपचार करण्यासाठी त्यांच्या आईवडिलांकडे पैसे नव्हते. त्यावेळी या उपचारासाठी महिना ९०० डॉलर्स खर्च करावे लागत असत. अखेरी मेस्सी वयाच्या ११ व्या वर्षीच स्पेनला गेला आणि त्याने बार्सिलोना संघाबरोबर करार केला. या संघाने मेस्सीच्या सर्व उपचारचा खर्च केला होता. मेस्सी कडे आर्जेन्टिना आणि स्पेन असे दोन देशांचे पासपोर्ट आहेत. त्याने स्पेनचे नागरिकत्व २००५ मध्ये घेतले आहे.

मेस्सी जसा महान खेळाडू आहे तसाच एक चांगला माणूस आहे. त्याची प्रेम कहाणी अनोखीच म्हणावी लागेल. मेस्सी सांगतो वयाच्या पाचव्या वर्षी त्याने प्रथम अंतोनियो हिला पाहिले होते. एकूण ३५ वर्षाच्या आयुष्यापैकी ३० वर्षे तो तिच्या प्रेमात आहे. या जोडप्याला थीएगो, मातियो आणि सिरो अशी तीन मुले आहेत. मेस्सीची संपत्ती कोट्यावधीची असून त्यात अनेक घरे, कार्स, फार्म हाउस, याट सामील आहेत.

बार्सिलोना कडून खेळत असताना मेस्सी १० नंबरची जर्सी वापरत असे. सात वेळा ‘बलोन डी ओर’ पुरस्काराचा मानकरी असलेल्या मेस्सीने आर्जेन्टिना कडून कप्तान म्हणून खेळताना गतवर्षी कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली आहे आणि फिफा वर्ल्ड कप २०१४ च्या फायनल मध्ये धडक मारली आहे. आता त्याला फिफा वर्ल्ड कप जिंकण्याची प्रतीक्षा आहे.