Sharpen Mixer Grinder Blades : जर तुम्हाला मिक्सर ब्लेडची वाढवायची असेल धार, तर घरी बसून या टिप्स करा फॉलो


भारतात, मसाले किंवा भाज्या वाटण्यासाठी पाट्याचा वापर केला जात असे. स्त्रिया कोणत्याही प्रकारचे कोरडे मसाले दगडाच्या पाट्यावर हाताने वाटत होत्या, तर चटणी वगैरे बनवण्यासाठी कोथिंबीर, मिरच्या यांसारख्या भाज्याही पाट्यावर वाटल्या जात. आजही अनेक घरांमध्ये पाट्याचा वापर केला जातो, पण आता भारतीय स्वयंपाकघरातील काम सोपे करण्यासाठी अनेक प्रकारची उपकरणे आली आहेत.

मायक्रोवेव्ह, इंडक्शन, इलेक्ट्रिक केटल, ज्युसर आणि मिक्सर ग्राइंडर इत्यादी स्वयंपाकघरातील उपकरणांद्वारे स्वयंपाक करताना बरेच काम कमी वेळेत सहज होते. उदाहरणार्थ, मसाले किंवा भाज्या बारीक करण्यासाठी आणि रस तयार करण्यासाठी मिक्सरचा वापर केला जात आहे. मिक्सरमधील ब्लेडने भाज्या आणि मसाले बारीक वाटून घेतले जातात. मात्र, जेव्हा मिक्सरची ब्लेडची धार कमी होऊ लागते, तेव्हा मसाले बारीक करण्यात अडचण येते. मिक्सरच्या ब्लेडची धार वाढवण्यासाठी लोक बाजारात जातात, पण जर तुम्हाला घरीच मिक्सरच्या ब्लेडची धार वाढवायची असेल, तर तुम्हाला यासाठी काही सोप्या टिप्सचा अवलंब करावा लागेल. घरच्या घरी मिक्सर ब्लेड्स सहजपणे तीक्ष्ण करण्यासाठी तुम्हाला फक्त 10 मिनिटे लागतील.

मिक्सर ग्राइंडरच्या ब्लेडची धार कशी वाढवायची

1- मिक्सर ब्लेडची धार तीक्ष्ण करण्यासाठी सॅंडपेपरचा वापर करा. सँडपेपर कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानात 10-20 रुपयांना सहज उपलब्ध आहे. यामुळे कापण्याचा धोकाही कमी असतो.

2- सर्वप्रथम मिक्सर ग्राइंडरमधून ब्लेड उघडून बाहेर काढा.

3- आता ब्लेड सँडपेपरने घासून घ्या.

4- या दरम्यान ब्लेडवर पाण्याचे थेंब सतत टाकत रहा.

5- ब्लेडला पाच ते आठ मिनिटे सतत घासत राहा.

टीप- ब्लेड घासण्यासाठी तुम्ही सँडपेपर सपाट जागेवर ठेवून त्यावर ब्लेड घासू शकता. अशा प्रकारे ब्लेडची धार सहजपणे तीक्ष्ण केली जाईल.

इतर मार्गांनी ब्लेड धारदार करणे

  • जर तुम्हाला सॅंडपेपर वापरायचा नसेल तर तुम्ही प्युमिस स्टोन, अॅल्युमिनियम फॉइल किंवा लोखंडी रॉड देखील वापरू शकता.
  • ब्लेडची तीक्ष्णता वाढविण्यासाठी नियमित दगड देखील वापरला जाऊ शकतो.


या गोष्टी लक्षात ठेवा

  • तुम्ही मिक्सर ब्लेडला सॅंडपेपरने तीक्ष्ण करत असाल किंवा इतर कोणत्याही प्रकारे, तर तुमच्या हातात हातमोजे घाला.
  • ब्लेडची तीक्ष्णता वाढवण्यासाठी तुम्ही जे पाणी वापरत आहात, ते गरम असल्यास चांगले होईल. आपण पाण्यात दोन चमचे मीठ घालू शकता.