पेंटागॉन, एलोन मस्क यांच्या स्टारशिप रॉकेटचा असा करणार वापर
पेंटागॉन या अमेरिकी लष्करी मुख्यालयाने स्टार स्पेसचे मालक एलोन मस्क यांच्या स्टारशिप रॉकेट साठी खास करार केल्याची काही कागदपत्रे लिक झाली आहेत. त्यानुसार पुढच्या पाच वर्षात रॉकेटमधून सैन्य सामान इच्छित स्थळी पाठविणे खर्चाच्या दृष्टीने व्यवहार्य असेल काय याच्या चाचण्या घेतल्या जात आहेत असे समजते. या चाचण्या यशस्वी झाल्या तर स्पेस एक्सच्या रॉकेट मधून हत्यारे आणि अन्य सैन्य सामान जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात अमेरिका एक तासाच्या आत पोहोचवू शकणार आहे. अशी एक स्क्वाड्रनच तयार करण्याचा अमेरिकेच्या रक्षा मंत्रालयाचा प्रयत्न आहे असे समजते.
एलोन मस्क यांची रॉकेट अनेकवेळा परत परत वापरता येतात आणि याच मुळे कमी खर्चात अशी वाहतूक अतिशय वेगाने करणे शक्य होणार आहे. ही योजना यशस्वी झाली तर मालवाहतूक विमानांसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. एक तासापेक्षा कमी वेळात हवी ती युद्ध सामग्री हव्या त्या जागी नेणे शक्य होणार आहे. चीन बरोबर युद्धाची वेळ आलीच तर प्रशांत महासागरात अविश्वसनीय वेगाने सैन्य मदत पोहोचविणे अमेरिकेला शक्य होणार आहे.
पेंटागॉनचे स्पेस फोर्स हे गस्ती पथक अंतराळात चंद्रावर तसेच अंतराळातून येणाऱ्या धोक्यांवर नजर ठेवण्याचे काम करते आहेच. हे रॉकेट १६५ फुट लांबीचे असून वायुसेनेला त्याचा खूप फायदा झाला आहे असे सांगितले जाते.