वेस्टइंडीज नवीन क्रिकेट फॉर्मेट आणणार
वेस्ट इंडीज आणि कॅरेबियन प्रीमियर लीग मिळून क्रिकेट मध्ये एक नवीन फॉर्मेट आणण्याच्या तयारीत आहेत. याला ‘द सिक्सटी- क्रिकेट पॉवर गेम’ असे नाव दिले गेले आहे. या फॉर्मेटच्या पहिल्या एडिशन मध्ये पुरुष आणि महिला टीम ६० बॉलची टूर्नामेंट खेळतील. जगभरातील सर्व क्रिकेटर यात सामील होतील असे सांगितले जात आहे. या वर्षीच्या टूर्नामेंटचा टायटल स्पॉन्सरर स्काय एक्स आहे.
क्रिकेट लीग मधील हे क्रांतिकारी पाउल असून यामुळे टी १० क्रिकेट पूर्ण बदलू शकते. अतिशय वेगवान आणि अॅक्शनने भरपूर अशी ही लीग असेल असे म्हटले जात आहे. यात फलंदाजी करणाऱ्या टीमच्या सहा विकेट पडल्या कि टीम ऑल आउट होणार आहे . यात दोन पॉवर प्ले मिळतील पण जर प्रथम पहिली टीम १२ चेंडूत दोन षटकार ठोकू शकली तर तिसरा पॉवर प्ले मिळू शकेल. एका गोलंदाजाला दोन ओव्हर टाकता येतील. वेळेत गोलंदाजी पूर्ण झाली नाही तर शेवटचे सहा चेंडू टीमच्या एका सदस्याला बाहेर थांबावे लागणार आहे.
यात मिस्ट्री हिट कल्पना सुद्धा आहे. ज्यात चाहते फ्री हिट साठी व्होट करू शकणार असून त्या काळात फलंदाज आउट होऊ शकणार नाही. याच वर्षी २४ ते २८ ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा सेंट किट्स अँड नेविस येथे खेळली जाणार आहे असे समजते.