फ्रांस मधील २५ टक्के नागरिकांना बहिरेपणा- ईअरफोन लावत असाल तर सावधान

फ्रांस मध्ये अनेक नागरिकांना कानाची क्षमता कमी होत असल्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर येथे प्रथमच प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या संदर्भात रिसर्च केला गेला असून त्यात १८ ते ७५ वयोगटातील १,८६,४६० लोकांच्या चाचण्या केल्या गेल्या. त्यात दर चार नागरिकांमागे एकाला ऐकू येण्याची समस्या असल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ फ्रांस मधील २५ टक्के नागरिकांना ऐकु कमी येण्याची समस्या भेडसावते आहे.यातूनच हळूहळू हे नागरिक बहिरेपणा कडे जात असल्याचे दिसून आले आहे.

रिक्षा, बस, मेट्रो आणि अन्य वाहनांचे सततचे आवाज, लाईफ स्टाईल, सोशल आयसोलेशन, डिप्रेशन, तीव्र आवाजात संगीत ऐकणे, कानात ईअरफोन घालून त्यावर मोठ्या आवाजात संगीत ऐकणे अशी अनेक कारणे बहिरेपणा येण्यास कारणीभूत असल्याचे या संशोधानातून समोर आले आहे. नॅशनल हेल्थ अँड मेडिकल इन्स्टीट्युट तर्फे हा रिसर्च करण्यात आला. त्यात बहिरेपण येण्याची वरील कारणे समोर आली. फ्रांस मध्ये बाहेरचे आवाज टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हेडफोन वापरले जातात. पण त्यामुळे सुमारे ३७ टक्के लोकांना हिअरिंग एड वापरण्याची वेळ आली आहे. आता देशात हिअरिंग एड मोफत दिली जातात असे समजते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात १५० कोटी लोकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारची ऐकू न येण्याची समस्या आहे. २०५० पर्यंत हा आकडा २५० कोटींवर जाईल असा इशारा दिला गेला आहे. गरजेपेक्षा जास्तवेळ हेडफोन कानाला लावल्यास ऐकण्याची क्षमता कमी होते आणि दीर्घकाल तीव्र आवाजात गाणी ऐकण्यामुळे कानात आवाज येणे, डोकेदुखी, कान दुखी, झोप न येणे ही लक्षणे दिसतात असे तज्ञ सांगतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही