युएमआयडीजीचे दोन धाकड फोन बायसन टू आणि बायसन प्रो
युएमआयडीजी ने त्यांचे लेटेस्ट फ्लॅगशिप सिरीज मधील फोन बायसन टू आणि बायसन टू प्रो अली एक्स्प्रेस वर २७ जून २०२२ रोजी ग्लोबली उपलब्ध होत असल्याची घोषणा केली आहे. हे दोन्ही रग्ड स्मार्टफोन आहेत. बायसन टू ची किंमत १६९.९९ डॉलर्स म्हणजे १३२४७ तर प्रो ची किंमत १५८८५ रुपये आहे. अर्थात या किंमती लिमिटेड पिरीयड साठी असून ही वर्ल्ड प्रीमियर ऑफर असल्याचे आणि नंतर फोनच्या किमती वाढविल्या जाणार असल्याचे सांगितले गेले आहे.
युएमआयडीजीचे फोन मजबुती साठी प्रसिद्ध आहेत. आयपी ६८/६९ के व एमआयएल- एसटीडी-८१० जी प्रमाणपत्रे या फोनला मिळाली आहेत. म्हणजे हे डस्टप्रुफ, वॉटरप्रुफ, शॉकप्रुफ आहेत. हा फोन पाण्यात बुडाला तरी किंवा जमिनीवर आपटला गेला तरी त्याला काहीही नुकसान होणार नाही. सतत प्रवास कराव्या लागणाऱ्या किंवा ट्रेकिंग प्रेमींसाठी हे फोन फार उत्तम असल्याचा दावा केला जात आहे.
बायसन टू ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज तर प्रो साठी ८ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज दिले गेले आहे. दोन्ही फोन साठी ६.५ इंची, एचडी प्लस डॉट इन डिस्प्ले दिला गेला आहे. ४८ एमपीचा प्रायमरी, १६ एमपीचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि ५ एमपीचे मॅक्रो लेन्स असा ट्रिपल कॅमेरा रिअरला असून फ्रंटला सेल्फी साठी २४ एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. फोनसाठी ६१५० एमएएचची बॅटरी १८ डब्ल्यू फास्ट चार्जिंग सह दिली गेली असून अँड्राईड १२ ओएस आहे. फोन साठी फिंगरप्रिंट सेन्सर, टाईप सी पोर्ट, पॉवर बटण दिले गेले आहे.