या बॉलीवूड अभिनेत्रींनी योगाला दिला ग्लॅमरचा तडका
आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. आरोग्य आणि मनशांती देणारा, रोगांना दूर ठेवणारा योगाभ्यास भारतात प्राचीन काळापासून केला जात आहे. आज जगभर प्रसिद्धीस आलेल्या भारताच्या या संस्कृतीपासून बॉलीवूड दूर राहिलेले नाही. उलट बॉलीवूड मधील अनेक अभिनेत्रींनी त्याला ग्लॅमरस रूप दिले आहे. बॉलीवूड मधील तजेलदार त्वचा, कमालीचा फिटनेस असणाऱ्या अनेक अभिनेत्री नियमित पणे योगासने करतात.
हॉट फिगरसाठी प्रसिद्ध असलेली मलाईका अरोरा स्वतः नियमित योगासने करतेच पण एक योग स्टुडीओ सुद्धा चालविते. प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर प्रथम आई बनली तेव्हापासूनच ती योग प्रसार करते आहे. कुणाच्याही आयुष्यात योग किती गरजेचा आहे हे करीना वारंवार सांगत असते. तिची बहिण करिश्मा सुद्धा योग करते.
भारताची पहिली विश्वसुंदरी बनलेली आणि नंतर बॉलीवूड मध्ये अभिनेत्री म्हणून कारकीर्द गाजविणारी सुश्मिता सेन रोजच तिचे योग फोटो सोशल मिडीयावर शेअर करते. योगाचे महत्व सांगते. तिचे वय वाढले तरी चेहऱ्याची चमक कायम आहे आणि यामागे योग कारणीभूत असल्याचे तिचे म्हणणे आहे.
अतिशय सुंदर फिगरसाठी प्रसिद्ध शिल्पा शेट्टी हिचे तर योगासनाचे अनेक व्हिडीओ युट्यूब वर आहेत. योगासाठी ती कधीच सुटी घेत नाही. आलीया भट्ट, नर्गिस फक्री, लारा दत्त या अभिनेत्री सुद्धा नियमाने योग करतात.
बॉलीवूड मधील सर्वात फिट अभिनेत्री म्हटली जाणारी जॅकलीन फर्नांडीस ही सुद्धा योगाची चाहती आहे आणि नियमाने योगाभ्यास करते. सोशल मिडीयावर त्याचे अनेक पुरावे मिळतील.