Washington DC Shooting : अमेरिकेत पुन्हा गोळीबार, हल्लेखोराने पोलिस अधिकाऱ्यासह अनेकांवर झाडल्या गोळ्या


वॉशिंग्टन – अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये पुन्हा गोळीबार झाला आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्यासह अनेकांना गोळ्या लागल्या. ही घटना जुनीटींथ म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान घडल्याचे सांगितले जात आहे. हल्लेखोराने म्युझिक कॉन्सर्टच्या ठिकाणी लोकांवर गोळीबार केला.

वॉशिंग्टन पोलिस विभागाने सांगितले की, म्युझिक कॉन्सर्टच्या ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत एका तरुणाचा गोळ्या झाडून मृत्यू झाल्याचे वॉशिंग्टन पोलिसांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले. एका पोलीस अधिकाऱ्याशिवाय अन्य दोन जण जखमी झाले. ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.