रियलमी सी ३० बजेट फोन भारतात सादर
लेटेस्ट डिझाईनचा आणि सर्वसामान्य माणसाला सहज परवडेल अश्या किमतीचा रिअलमी सी ३० स्मार्टफोन २० जून, सोमवारी दुपारी १२.३० मिनिटांनी भारतात लाँच केला जात असून फ्लिपकार्टवर तो विक्रीसाठी उपलब्ध केला जात आहे. अतिशय आकर्षक डिझाईनच्या या फोनला अनेक खास फीचर्स दिली गेली आहेत.
लाँच पूर्वीच लिक झालेल्या फोटो नुसार या फोनला ६.५ इंची एफएचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला गेला असून टॉप सेंटर ड्यूडोप नॉच आहे. यातच ५ एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. रियरला सिंगल पण मोठ्या आकाराचा १३ एमपीचा कॅमेरा आहे. फोन साठी ५ हजार एमएएच बॅटरी असून तिला १० डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला गेला आहे. अँड्राईड १२ गो व्हर्जनवर चालणारी ओएस असून फोनची जाडी फक्त ८.५ एमएम आहे.
२ जीबी रॅम आणि ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोरेज मध्ये हा फोन येईल. त्याची किंमत १० हजारच्या दरम्यान असेल असे समजते. फोनला मायक्रो युएसबी पोर्ट, हेडफोन जॅक, उजवीकडे व्हॉल्यूम कंट्रोल व पॉवर बटन, डावीकडे सिम कार्ड स्लॉट दिला गेला आहे. ब्लू, बांबू ग्रीन आणि डेनिम ब्लॅक अश्या तीन रंगात हा फोन उपलब्ध आहे.