2019 मध्ये धर्मा प्रॉडक्शनने ‘दोस्ताना 2’ या चित्रपटाची घोषणा केली आणि या चित्रपटाचे कामही जबरदस्त पद्धतीने सुरू झाले. मात्र या चित्रपटातील स्टारकास्टवरून बराच वाद झाला होता. त्यामुळेच स्क्रिप्ट तयार होऊनही या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू झालेले नाही. चित्रपटात कार्तिक मुख्य अभिनेता म्हणून दिसणार होता, निर्मात्यांनी त्याची उचलबांगडी केली. त्याच वेळी, आता या चित्रपटाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे असे दिसते आहे की लवकरच हा चित्रपट पुन्हा एकदा फ्लोअरवर येऊ शकतो. आता या चित्रपटात अक्षय कुमार दिसणार असल्याचा दावा केला जात आहे.
Dostana 2 : कार्तिकसोबत नाही तर अक्षय कुमारसोबत बनणार ‘दोस्ताना 2’, 29 वर्षीय हिरोईनसोबत करणार रोमान्स
अक्षयच्या यादीत आणखी एका चित्रपटाची भर?
अक्षय कुमारचा शेवटचा चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. पण तरीही अभिनेत्याचे स्टारडम कायम आहे. दरम्यान, एक असा रिपोर्ट समोर आला आहे ज्यात दावा करण्यात आला आहे की धर्मा प्रोडक्शनचा चित्रपट ‘दोस्ताना 2’ देखील अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यनला बाहेर काढल्यानंतर निर्मात्यांनी अक्षय कुमारशी संपर्क साधला आहे. निर्माते आणि अक्षय कुमार यांच्यात चर्चा सुरू आहे.
स्क्रिप्टमध्ये बदल
रिपोर्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, जर निर्माते आणि अक्षय कुमार यांच्यात बोलणी झाली, तर लवकरच अक्षय कुमारला लक्षात घेऊन चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये काही खास बदल केले जातील. मात्र, चित्रपटाच्या स्टारकास्टमधील बदल लक्षात घेऊन निर्मात्यांनी पुन्हा एकदा स्क्रिप्टवर काम सुरू केले आहे. ‘दोस्ताना 2’ ची मुख्य अभिनेत्री जान्हवी कपूर आहे, म्हणजेच आता अक्षय कुमार जान्हवी कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. अक्षयच्या एंट्रीमुळे या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होऊ शकते, असा दावाही केला जात आहे.
चित्रपटातून का बाहेर पडला कार्तिक आर्यन ?
सुरुवातीच्या काळात ‘दोस्ताना 2’मध्ये कार्तिक आर्यनची निवड झाली होती. इतकंच नाही तर चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले होते. मात्र 30 दिवसांच्या शूटिंगनंतर कार्तिक आर्यनला चित्रपटातून बाहेर फेकण्यात आले. त्यावेळी करण जोहरने एक विधान केले होते, ज्यामध्ये कार्तिकला ‘अनप्रोफेशनल’ म्हटले होते.
2008 साली आला होता ‘दोस्ताना’
‘दोस्ताना 2’ हा 2008 मध्ये आलेल्या ‘दोस्ताना’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसले होते. चित्रपटाची कथा दोन मित्रांबद्दल होती, जे एका मुलीसोबत अपार्टमेंट शेअर करण्यासाठी समलिंगी असल्याचे भासवतात. मात्र, दोघेही मुलीच्या प्रेमात पडतात.