Presidential Election : फारुख अब्दुल्ला यांची राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार, आता सक्रिय राजकारण करणार


जम्मू : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. राष्ट्रपतीपदासाठी संभाव्य संयुक्त विरोधी उमेदवार म्हणून माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले.

मला विश्वास आहे की, जम्मू-काश्मीर एका वळणावरून जात आहे. या अनिश्चित काळात नेव्हिगेट करण्यासाठी माझे प्रयत्न आवश्यक आहेत. अधिक सक्रिय राजकारण आपल्या पुढे असल्याचे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीर आणि देशाच्या सेवेसाठी ते सकारात्मक योगदान देण्यास उत्सुक आहेत. नावाचा प्रस्ताव दिल्याबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदींचे आभार.