फक्त सलमान खानच नाही, तर हा स्टार देखील होता लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर, नाव ऐकून व्हाल थक्क


बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना मिळालेल्या धमक्यांचे गूढ अद्याप पूर्णपणे उकलले नसतानाच तपासात आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धू मुसेवाला प्रकरणात पकडले गेलेला आरोपी सौरव कांबळे उर्फ ​​महाकाल याच्या चौकशीदरम्यान, फिल्म इंडस्ट्रीतील आणखी एक व्यक्ती बिश्नोई टोळीचे लक्ष्य असल्याची माहिती मिळाली आहे. होय, सलमान खानशिवाय इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरही बिश्नोई गँगच्या रडारवर होता.

महाकालने केला खुलासा
होय, मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, बिश्नोई टोळीने तयार केलेल्या हिट लिस्टमध्ये फिल्म इंडस्ट्रीतील सलमान खान व्यतिरिक्त फिल्ममेकर करण जोहरचेही नाव होते. वृत्तानुसार, सलमान खान धमकी प्रकरणी सौरव उर्फ​महाकाल यानेच पुणे पोलिसांच्या चौकशीदरम्यान हा खुलासा केला आहे.

करण जोहरच्या या कृत्यामुळे संतप्त झाली होती बिश्नोई टोळी
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला चित्रपट दिग्दर्शक करण जोहर जबाबदार असल्याचे सौरवने पुणे पोलिसांना सांगितले. त्यामुळेच आम्ही चित्रपट निर्माता करण जोहरला धमकावून 5 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या तयारीत होतो.