जम्मू – दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पंपोर भागात दहशतवाद्यांनी एका पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या घालून करून हत्या केली. त्याचा मृतदेह गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे.
Jammu and Kashmir : पंपोर, पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केली उपनिरीक्षकाची हत्या, गोळ्यांनी छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक फारुख अहमद मीर यांच्यावर शुक्रवारी मध्यरात्री पंपोर भागातील संबुरा येथे हल्ला झाला. फारुख अहमद मीर यांचा मृतदेह त्यांच्या घराजवळील भातशेतीत आढळून आला.
प्राथमिक तपासात असे दिसून आले की, काल संध्याकाळी ते आपल्या भातशेतीत काम करण्यासाठी घरातून निघाले होते, तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मीर सीटीसी लेथपोरा येथे आयआरपी 23 व्या बटालियनमध्ये तैनात होते.