KKR नंतर आता शाहरुख खान बनला महिला क्रिकेट संघाचा मालक, ट्विट करून म्हणाला – मला आशा आहे…


बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानला खेळावर प्रचंड प्रेम आहे. यामुळेच तो अनेक खेळांवर आधारित चित्रपटांमध्ये दिसला आहे. ‘चक दे ​इंडिया’ चित्रपटात महिला हॉकी संघाचा प्रशिक्षक बनल्यानंतर आता शाहरुख खऱ्या आयुष्यात महिला क्रिकेट संघाचा मालक बनला आहे. आयपीएलच्या कोलकाता नाइट रायडर्सचा मालक शाहरुख खानने महिला संघाची मालकी घेतली आहे. शाहरुखच्या या महिला संघाचे नाव त्याच्या पहिल्या संघ KKR प्रमाणेच ठेवण्यात आले आहे.

शाहरुखने ठेवले हे नाव
शाहरुखने त्याच्या नव्या संघाचे नाव त्रिनबागो नाइट रायडर्स (TKR) ठेवले आहे. त्याची माहिती संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आली आहे. संघाच्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, सर्व प्रथम नाइट रायडर्स महिला संघाला नमस्कार. 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या महिला सीपीएलच्या उद्घाटनासाठीही हा संघ लढणार आहे.


शाहरुख खानने हे ट्विट रिट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. शाहरुख खानने ट्विटरवर लिहिले, हा खरोखर आनंदाचा क्षण आहे. लाइव्ह मॅच दरम्यान मी तिथे असण्याची आशा करतो. शाहरुख खानचा हा संघ लवकरच सुरू होणाऱ्या कॅरेबियन प्रीमियर लीगचा पहिला सामना खेळणार आहे.


विशेष म्हणजे शाहरुख सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे खूप चर्चेत आहे. तो लवकरच तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अॅटलीचा चित्रपट जवान, यशराजचा चित्रपट पठाण आणि राजकुमार हिराणीचा डंकी या चित्रपटात तो आपले अभिनय कौशल्य दाखवताना दिसणार आहे. याशिवाय तो लाल सिंग चड्ढा आणि ब्रह्मास्त्रमध्येही कॅमिओ करताना दिसणार आहे. झिरो चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर शाहरुख चित्रपटांपासून दुरावला होता. या चित्रपटानंतर तो तब्बल 4 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे.