राष्ट्रपती निवडणुकीसाठी लालू यादव यांचाही अर्ज

राष्ट्रपती निवडणुकीसाठीचे मतदान १८ जुलै रोजी होत असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत २९ जून आहे. या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत १५ अर्ज दाखल झाले असून लालूप्रसाद यादव या नावाचा अर्ज सुद्धा दाखल केला गेला आहे. हे लालूप्रसाद बिहारचेच असले तरी ते सारण मधील एक सर्वसामान्य नागरिक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दाखल झालेल्या १५ अर्जांपैकी ३ अपुरी कागदपत्रे असल्याने नाकारले गेले आहेत.

राष्ट्रपतीपदासाठी अर्ज भरण्याची सुरवात १५ जून रोजी झाली तेव्हा पहिल्याच दिवशी ११ अर्ज दाखल केले तर गुरुवारी ३ अर्ज आले. पहिल्या दिवशी १ तर गुरुवारी दोन अर्ज रद्दबातल केले गेले. अर्जांची तपासणी ३० जून रोजी होणार आहे. मुंबई तून संजय सावजी देशपांडे यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला असल्याचे समजते. ग्वाल्हेर येथून आनंद सिंह कुशवाह, अहमदाबाद मधून प्रटेल लालजीभाई, बिहार मधून सत्यनारायण प्रसाद यांचे अर्ज आले आहेत. राष्ट्रपती निवडणुकीसाठी अर्ज भरताना किमान ५० अनुमोदक आणि ५० समर्थक असणे बंधनकारक केले गेले आहे. या निवडणुकीसाठी अनामत रक्कम १५ हजार रुपये आहे.