नॉर्टन मोटर्सची नवी स्पोर्ट्स बाईक- किंमत ४२ लाख रुपये
ब्रिटीश बाईक निर्माती नॉर्टन मोटर्सने नवी स्पोर्ट्स बाईक सादर केली असून तिचे नाव आहे व्ही4एसव्ही. या बाईकची किंमत भारतात विकल्या जात असलेल्या टॉप एंड एसयुव्ही फोर्च्यूनर पेक्षा अधिक आहे. व्ही४एसव्हीची किंमत आहे ४४ हजार पौंड म्हणजे ४१ लाख ४२ हजार रुपये. या बाईकचे डिझाईन प्रोडक्शन इन हाउस लेव्हलवर केले गेले असून तिला अनेक खास फीचर्स दिली गेली आहेत.
बाईक साठी फुल एलईडी लायटिंग, ऑटो ब्राईटनेस अॅडजस्टमेंट, ६ इंची कलर टीएफटी डिस्प्ले, रिअर व्यू कॅमेरा, टींटेड विंडस्क्रीन दिला गेला आहे. १२०० सीसी लिक्विड कुल व्ही ४ इंजिन दिले गेले आहे मात्र टॉप स्पीडचा खुलासा केला गेलेला नाही. ही बाईक अॅडव्हान्स्ड फीचर्स आणि टेक्नोलॉजीने युक्त आहे. बाईक ला वेट, रोड आणि स्पीड असे ड्रायव्हिंग मोड आहेत.
बाईकची बॉडी पूर्णपणे कार्बन फायबरची असून १५ लिटरचा फ्युअल टँक सुद्धा कार्बन फायबर पासूनच बनविला गेला आहे. या इंधनटाकी मध्ये केवलर रीइन्फोसमेंट चा वापर केला असून हे मटेरीयल बुलेटप्रुफ जॅकेट साठी वापरले जाते. बाईकला फुटरेस्ट आणि पॅडल दिले गेले आहे. ही बाईक दोन कलर ऑप्शन मध्ये आहे. कार्बन आणि मॅक्स सिल्व्हर असे हे दोन कलर्स आहेत.