गुरुग्राम – भाजपच्या माजी प्रवक्ते नुपूर शर्मा यांना धमकी देण्याच्या संदर्भात भीम आर्मीचे प्रमुख नवाब सतपाल तनवार यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुग्राममधील तनवारच्या निवासस्थानातून अटक केली गेली आहे. जो कोणी नुपूरची जीभ कापेल त्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे तनवारने यापूर्वी जाहीर केले होते. पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Nupur Sharma Case : भीमा आर्मीचे प्रमुख सतपाल तनवार यांना अटक, केली होती नुपूरची जीभ कापणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा
कानपूरमधील भीमा आर्मीचे प्रमुख सतपाल तनवार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सतपाल यांनी म्हटले होते की जो कोणी नूपर शर्माची जीभ कापून आणून देईल, त्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. डीसीपी ईस्टर्न प्रमोद कुमार म्हणाले की, आरोपींवर धार्मिक भावनांना त्रास देण्यासह इतर गंभीर कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुपूर शर्मा हिने मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती. तेव्हापासून मुस्लिम समुदायाच्या लोकांमध्ये नुपूर शर्माबद्दल खूप राग आहे.