६० घोडे आणि १२०० स्पर्धकांना हरवून या पठ्ठ्याने जिंकली रेस

माणूस आणि घोडा यांच्यात पळण्याची रेस लागली तर घोडाच जिंकणार असे उत्तर बहुतेक सर्व देतील. पण ब्रिटन मधील धावपटू रिकी लाईटफुट याने हा समज खोटा पडला आहे. त्याने असंभव ते संभव करून दाखविताना ३५ किमीची रेस ६० घोडे आणि १२०० स्पर्धकांना हरवून जिंकली आहे. ही अनोखी रेस ब्रिटनच्या वेल्श लॉनयार्ड मध्ये आयोजित केली गेली होती.

३७ वर्षाच्या रिकीने यापूर्वी फायरफायटर म्हणून काम केले आहे. त्याने ही रेस २ तास २२ मिनिटे आणि २३ सेकंदात जिंकली. रनर अप ठरले लेनहौ बॉय आणि किं अलमन नावाचे दोन घोडे. १५ वर्षांच्या गॅप नंतर माणसाने ही रेस जिंकली आहे. २००७ मध्ये फ्लोरेन होल्टिंगर याने ही रेस जिंकली होती. या रेसची सुरवात १९८० मध्ये झाली आणि त्याला कारण झाली एक पैज.

असे सांगतात कि एका पब मध्ये स्थानिक लोकांत चर्चा सुरु झाली कि घोडा आणि माणूस यांच्यात पळण्याची रेस लावली तर कोण जिंकेल? त्यावरून माणूस घोड्याला हरवेल यावर पैज लागली. पण त्यासाठी २४ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. त्यात प्रथम २००४ साली हॉलोब या व्यक्तीने खरोखरच २ तास ५ मिनिटात घोड्याला हरवून रेस जिंकली.यावेळच्या रेस मध्ये रिकी लाईटफुट बरोबर अन्य १२०० स्पर्धक सुद्धा उतरले होते. रिकीला विजयाबद्दल ३५०० पौंड बक्षीस दिले गेले आहे.