२१०० सालात चीनची लोकसंख्या निम्म्याने तर भारताची २९ कोटींनी कमी होणार

संयुक्त राष्ट्रसंघाने २१०० सालापर्यंत जगाची लोकसंख्या ११ अब्जांपेक्षा अधिक असेल असे अनुमान काढले होते मात्र लान्सेट मेडिकल जर्नल मधील एका रिपोर्ट मध्ये या विपरीत अंदाज वर्तविला गेला आहे. या रिपोर्ट नुसार २०६४ मध्ये जगाची लोकसंख्या ९.७ अब्ज या सर्वोच्च आकड्यावर जाईल मात्र त्यानंतर २१०० सालापर्यंत ही लोकसंख्या घटून ८.७९ अब्जावर येईल. जगाची सध्याची लोकसंख्या ८ अब्ज पेक्षा कमी आहे.

या नव्या रिपोर्ट नुसार भारताची लोकसंख्या या शतकाअखेर २९ कोटींनी घटणार आहे तर सध्या जगातील वृद्धांचा देश अशी ओळख असलेल्या चीनची लोकसंख्या वेगाने कमी होऊन सध्याच्या १४० कोटींवरून ७४ कोटींवर येणार आहे. म्हणजे या लोकसंख्येत ६६.८ कोटींची घट होणार आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांच्या दाव्यानुसार जगात लोकसंख्या घट ट्रेंड सुरु होईल आणि तो बदलणे शक्य होणार नाही.

चीनच्या लोकसंख्येत २०२१ मध्ये फक्त ४ लाख ८० हजाराची भर पडली आहे. २१०० सालात वर्किंग पॉप्युलेशन पेक्षा वृद्ध लोकसंख्या अधिक होईल. सध्या चीन, अमेरिका, भारत, पाकिस्तान हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत पण महिला शिक्षण, महिला नोकरी आणि बर्थ कंट्रोल यामुळे जन्मदर कमी होत जाणार आहे. १९६० च्या दशकात एक महिला सरासरी पाच मुलांना जन्म देत होती ते प्रमाण २१०० मध्ये एक मुलावर येईल. युरोप प्रमाणे आशिया, द.अमेरिका मध्ये लोकसंख्या कमी होईल पण आफ्रिकी देशात मात्र वाढ सुरु राहील अर्थात हा वेग सुद्धा कमीच असेल असे म्हटले जात आहे.