हिराबेन यांचा १०० वा वाढदिवस, मिळणार वेगळे गिफ्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन १८ जून रोजी वयाच्या १०० मध्ये प्रवेश करत आहेत. पंतप्रधान मोदी १७ आणि १८ जून रोजी गुजराथ दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसात त्यांचे अनेक कार्यक्रम होणार असून २१ हजार कोटींच्या विविध विकास योजनांचे उदघाटन आणि शिलान्यास त्यांच्या हस्ते होणार आहे. या सर्व धावपळीत मोदी १८ जून रोजी मातोश्री हिराबेन यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतील असे समजते.
हिराबेन, त्यांचे धाकटे पुत्र पंकज मोदी यांच्या समवेत गांधीनगर येथील रायसन भागात राहतात. गांधीनगर नगरपालिकेने रायसन ला जोडणाऱ्या ६० फुटी रस्त्याचे नामकरण ‘पूज्य हिरा मार्ग’ असे करण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर हितेश मकवाना म्हणाले,’ हिराबेन यांचे नाव रस्त्याला देण्यामागे पुढील पिढ्यांपर्यंत हे नाव पोहोचावे असा हेतू आहे.’
यापूर्वी कोविड काळात दोन वर्षानंतर मोदी यांनी गेल्या मार्च मध्ये आईची भेट घेतली होती. त्यानंतर ही दुसरी भेट असेल.