पुतीन यांचे मलमूत्र सुटकेस मध्ये एकत्र करतात बॉडीगार्ड
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन, युक्रेन युध्द तसेच त्यांच्या प्रकृतीवरून सध्या अधिक चर्चेत आले आहेत. पुतीन यांना कॅन्सर झाला आहे, त्यांना पार्किन्सन झाला आहे , पुतीन गंभीर आजारी आहेत असे दावे वारंवार केले जात आहेत. फॉक्स न्यूजने केलेल्या दाव्यानुसार एका बैठकीत पुतीन यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना डॉक्टरनी त्वरित आराम करण्याच्या सूचना दिल्या. याच बातमीत असे म्हटले गेले आहे की पुतीन परदेशी दौऱ्यावर जातात तेव्हा एक स्पेशल बॉडीगार्ड एक खास सुटकेस घेऊन चोवीस तास त्यांच्या बरोबर असतो आणि पुतीन स्वच्छतागृहात गेले तरी हा गार्ड त्यांच्या बरोबर जातो. या गार्डचे काम पुतीन यांचे मलमूत्र एकत्र करून मास्को येथे पाठविणे हे आहे. पुतीन यांचे मलमूत्र अन्य कुणाच्या हाती लागले तर पुतीन यांच्या आरोग्याबाबत आतली माहिती बाहेर येऊ शकते ही शक्यता लक्षात घेऊन ही खबरदारी घेतली जात आहे.
विशेष म्हणजे उत्तर कोरियाचा तानाशाह किम जोंग उन याच्या मलमुत्राबाबत सुद्धा अशीच काळजी घेतली जाते याच्या बातम्या पूर्वी आल्या आहेत. परदेशी दौऱ्यावर जाण्याची वेळ आली तर किम जोंग त्याचे स्वतःचे कमोड सोबत नेतो अशी चर्चा होती. रशियावर गेली दहा वर्षापेक्षा अधिक काळ शोध पत्रकारिता केलेल्या रेजेस जेन्ते आणि मिखाईल सबिन यांच्या कडून पुतीन यांच्याबाबत ही माहिती एका मुलाखतीत मिळाली असा दावा केला जात आहे. या दोघांच्या म्हणण्यानुसार रशियाची फेडरल गार्ड सर्व्हिस यासाठी कार्यरत आहे. त्यांचा एक विशेष गार्ड एका ब्रीफकेस सह पुतीन यांच्या सोबत सतत असतो. विशेष पॅकेट मधून पुतीन यांचे मलमूत्र मास्कोला रवाना केले जाते.
या दोन पत्रकारांनी केलेल्या दाव्यानुसार २९ मे २०१७ मध्ये फ्रांस यात्रेवर पुतीन आले तेव्हा हा प्रकार घडला होता तसेच २०१९ च्या ऑक्टोबर मध्ये पुतीन सौदी दौऱ्यावर होते तेव्हा सुद्धा अशीच खबरदारी घेतली गेली होती. युक्रेन युध्द सुरु झाल्यावर पुतीन एका व्हिडीओ मध्ये खोकत असल्याचे, अन्य एका व्हिडीओ मध्ये त्यांचे पाय ब्लँकेटने कव्हर केल्याचे तर आणखी एका व्हिडीओ मध्ये हाताला कंप असल्याने पुतीन यांनी खुर्ची घट्ट धरून ठेवल्याचे दिसले होते तेव्हापासून पुतीन यांच्या आजार चर्चेला उधाण आले आहे.