Test Rankings : कसोटी क्रमवारीत रोहित-कोहली पिछाडीवर, जो रुटचा अव्वल स्थानावर कब्जा


इंग्लंड कसोटी संघाचा माजी कर्णधार जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत जो रूटने धावा केल्या आणि आता त्याचा फायदा त्याला मिळाला आहे. जो रूट आता कसोटी क्रमवारीत नंबर-1 फलंदाज बनला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत जो रूट अव्वल स्थानावर आहे.

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन हा नंबर-1 कसोटी फलंदाज होता. मात्र या मालिकेत जो रुटने त्याला मागे टाकले, आता इंग्लिश फलंदाज जो रूटचे 897 गुण झाले आहेत, तर मार्नस लॅबुशेनचे 892 गुण आहेत.

टॉप 10 कसोटी फलंदाज-
1. जो रूट
2. मार्नस लॅबुशेन
3. स्टीव्ह स्मिथ
4. बाबर आझम
5. केन विल्यमसन
6. दिमुथ करुणारत्ने
7. उस्मान ख्वाजा
8. रोहित शर्मा
9. ट्रॅव्हिस हेड
10. विराट कोहली

जो रूट ऑगस्ट 2015 मध्ये (917 रेटिंग) प्रथमच कसोटी क्रमवारीत नंबर-1 बनला होता, तर जो रूट डिसेंबर 2021 मध्ये शेवटच्या वेळी या स्थानावर होता. जो रूट एकूण 163 दिवस कसोटीत नंबर 1 खेळाडू होता. जर आपण फॅब फोरबद्दल बोललो तर स्टीव्ह स्मिथ (1506 दिवस), विराट कोहली (469 दिवस) आणि केन विल्यमसन (245 दिवस) त्यांच्यासाठी नंबर-1 आहेत.

टीम इंडियाच्या फलंदाजांवर नजर टाकली तर टॉप-10 मध्ये फक्त दोन भारतीय आहेत. रोहित शर्मा 754 रेटिंगसह 8व्या तर विराट कोहली 742 रेटिंगसह 10व्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत आतापर्यंत 2 सामने खेळले असून त्यात त्याने 2 शतकांसह 305 धावा केल्या आहेत.