Prayagraj Violence : प्रयागराज हिंसाचारातील 40 हल्लेखोरांची छायाचित्रे जारी, या चित्रांवरून तयार होणार पोस्टर


प्रयागराज – प्रयागराजच्या अटाळा येथे शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या गदारोळाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. या चित्रांवरून आता पोस्टर तयार केले जाणार आहेत. घटनास्थळाजवळ बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या व्हिडिओ फुटेजमध्ये हल्लेखोरांची छायाचित्रे कैद झाली आहेत. लोकांना आरोपींबाबत काही माहिती असल्यास कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. एसएसपी अजय कुमार म्हणाले की, अटाळा गोंधळात सामील असलेल्या बदमाशांचे पोस्टर्स संध्याकाळपर्यंत जुन्या शहरात लावले जातील. व्हिडिओ फुटेजच्या आधारे एकूण 40 बदमाशांचे पोस्टर जारी करण्यात आले आहेत.

जाळण्यात आली डझनहून अधिक वाहने
10 जून रोजी शुक्रवारच्या नमाजानंतर अटाळामध्ये गोंधळ झाला होता. आता डझनहून अधिक गाड्यांना आग लावून झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याची तयारी सुरू आहे. नुकसान झालेल्या वाहनांची यादी जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागाकडून विभागीय परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, त्यामध्ये वाहनांचे मूल्यांकन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, आरटीओने नुकसान झालेल्या वाहनांची एकूण किंमत चार ते पाच लाख असल्याचे सांगितले आहे.

दगडफेकीप्रकरणी अटक केलेल्या दहा जणांचा जामीन अर्ज फेटाळला
यापूर्वी, शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या दगडफेकीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दहा जणांचे जामीन अर्ज दोन वेगवेगळ्या न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने फेटाळले आहेत. लावलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे जामिनासाठी पुरेसे कारण नाही. एक दिवसापूर्वीही दंडाधिकारी न्यायालयाने अर्धा डझन आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले होते.