अवलिया पंतप्रधान – बोरिस जोन्सन

बोरिस जोन्सन हे ब्रिटनचे पंतप्रधान अलीकडेच भारत भेटीवर येऊन गेले आणि येथे त्यांनी जेसीबीवर चढून दिलेल्या पोझ केवळ भारतात नाही तर जगभरात व्हायरल झाल्या. भारतीयांशी त्यांनी मोकळेपणाने साधलेला संवाद हा सुद्धा चर्चेचा विषय झाला. पण बोरिस खरे कसे आहेत याची ज्यांना माहिती आहे त्यांना बोरिस यांच्या या वर्तनाबद्दल मुळीच नवल वाटणार नाही. जोन्सन हे अवलिया कॅटेगरी मधील व्यक्ती आहेत असे म्हटले तर गैर ठरणार नाही.

बोरिस यांच्यामध्ये अनेक गुण आहेत. एक चांगला नेता, पत्रकार असलेले बोरिस कसलेले बॉक्सर सुद्धा आहेत. बोरिस अतिशय मजबूत माणूस आहेत आणि राजकीय, शारीरिक सामाजिक जोखीम घेण्यास अजिबात घाबरत नाहीत असे त्यांना चांगले ओळखणारे सांगतात. बोरिस यांचे व्यक्तिमत्व दिलचस्प आहे असे म्हणता येते.

बोरिस यांची ओळख ‘खतरे का खिलाडी’ अशी आहे.एकदा एखादी गोष्ट ठरवली कि मैदान सोडून पळ काढत नाहीत. ५५ वर्षाचे बोरिस यांनी पत्रकार, खासदार, मेयर, परराष्ट्रमंत्री, पंतप्रधान अश्या विविध स्थानांवर काम केले आहे. ते मूळचे तुर्की वंशाचे आहेत. त्यांचा जन्म न्यूयॉर्क येथे १९ जून १९६४ रोजी झाला. माता पिता ब्रिटीश असल्याने त्यांची जन्मनोंद अमेरिका शिवाय न्यूयॉर्कच्या ब्रिटीश वाणिज्य दूतावास अशी दोन ठिकाणी आहे. बोरिस यांनी पूर्वी रिपोर्टिंग केले आहे आता मात्र ते विविध सामाजिक मुद्द्यांवर लिखाण करतात.

बोरिस यांच्या आवडीचा एक डायलॉग आहे आणि अनेकदा त्यांनी त्याचा वापर केला आहे.’ युद्धात कुत्र्याचा आकार पाहिला जात नाही तर लढाई किती वेळ चालली हे महत्वाचे असते’ असे ते नेहमी सांगतात. त्यांचे मूळ नाव बोरिस डी पेफेफेल जोन्सन असे आहे पण ते बोरिस नावाने प्रसिद्ध आहेत. ते इंग्रज असले तरी त्यांचा परिवार मिश्र आहे. इंग्रज, तुर्क, मुस्लीम व ज्यू अश्या सर्व व्यक्तीचा त्यांचा कुटुंबात समावेश आहे. त्यांचे आजोबा तुर्कस्तानातील राजकीय व्यक्ती होते, त्यांचे नाव अली केमाल. त्यांची हत्या झाली होती.

बोरिस यांचे बालपण आईवडिलांसोबत गेले. प्रसिध्द चेल्सी हॉटेलसमोर त्यांचे निवासस्थान होते असे सांगतात.