येणार पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या

महिलांप्रमाणेच पुरुषांसाठी सुद्धा गर्भनिरोधक गोळ्या तयार करण्यात आल्या असून त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. या चाचण्यात या गोळ्यांमुळे कोणतेही दुष्परिणाम न होता पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. परिणामी विर्यात शुक्रजंतूंचे प्रमाण घटते आणि त्यामुळे गर्भधारणेचा धोका राहत नाही. नवीन संशोधनात असे दिसून आले की डीएसएव्ही व ११ बिटा एमएनटीडीसी नावाचे औषध टेस्टोस्टेरॉन कमी करते. यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते.

आज पुरुष नसबंदी आणि कंडोम अशी कुटुंबनियोजनाची दोनच साधने पुरुषांना उपलब्ध आहेत. म्हणजे कुटुंब नियोजनासाठी पुरुषांना महिलांच्या तुलनेत कमी पर्याय आहेत. यामुळे पुरुषांसाठी प्रभावी गर्भनिरोधक विकासाची गरज व्यक्त होत आहे. यामुळे अनपेक्षित गर्भधारणा टाळणे तसेच सार्वजनिक स्वास्थ्य राखण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. शिवाय परिवार नियोजनात पुरुष सक्रीय भूमिका बजावू शकणार आहेत.

वरील औषधाच्या चाचण्या दोन टप्प्यात ९६ निरोगी पुरुषांवर घेतल्या गेल्या. सात दिवस घेतलेल्या चाचण्या नंतर पुरुषांच्यात टेस्टॉस्टेरॉनचे प्रमाण कमी झाल्याचे दिसले पण त्याचा कुठलाही दुष्परिणाम झाला नव्हता. उलट अनेक पुरुषांनी हे औषध सुरु ठेवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले असून हे प्रमाण ७५ टक्के इतके आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही