भूलभुलैयाने कमाईत पुष्पा आणि आरआरआरला टाकले मागे
हिंदी चित्रपट सृष्टीत हिरो नंबर वनचा दावेदार बनलेल्या कार्तिक आयर्नच्या भूलभुलैय्या दोन ने सध्या धमाका सुरु ठेवला असून रिलीज झाल्याच्या चौथ्या रविवारी १० दिवसापूर्वी रिलीज झालेल्या अक्षयकुमारच्या पृथ्वीराज ला मागे टाकलेच पण भूलभुलैयाने आणखी एक कमाल केली आहे. रविवारच्या कमाईत या चित्रपटाने आरआरआर आणि पुष्पा पार्ट वन ला मागे सारले आहे. २४ व्या दिवसाच्या कमाईत भूलभुलैयाने सलमानच्या बजरंगी भाईजान आणि टायगर जिंदा है तसेच रणबीरच्या संजूला सुद्धा पिछाडीवर सोडले आहे.
कार्तिक आयर्न बरोबर तब्बू आणि कियारा अडवाणी यांच्या भूमिका असलेल्या भूलभुलैय्याने बॉक्स ऑफिसवर चौथ्या आठवड्यात सुद्धा मोठा बिझिनेस करून ३.८० कोटींची कमाई केली आहे. शनिवारी सुद्धा या चित्रपटाने ३.०१ कोटींची कमाई केली. चौथ्या आठवड्यात या चित्रपटाची नेट कमाई ८.३७ कोटी होती आणि एकूण कमाई १७१.५२ कोटी झाली आहे. लवकरच हा चित्रपट २०० कोटी टप्पा गाठेल असा अंदाज आहे.
चौथ्या आठवड्यात आरआरची कमाई ३.७५ कोटी तर पुष्पा पार्ट १ ची कमाई ३.५० कोटी होती असे आकडेवारी वरून दिसून येते.