Shangri-La Dialogue : चीनला रोखण्याची ताकद फक्त भारताकडे


चीनची आक्रमक वृत्ती आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वाढती शक्ती यांच्यामध्ये जगातील प्रत्येक देशाचे लक्ष भारताकडे लागले आहे. अनेक देशांचा असा विश्वास आहे की आशियामध्ये केवळ भारतच शक्ती संतुलन स्थापित करू शकतो. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांचेही असेच मत आहे. सिंगापूरमधील शांग्री लॉ डायलॉगमध्ये ते म्हणाले की, भारताची वाढती शक्तीच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात स्थिरता प्रस्थापित करू शकते. भारताची वाढती लष्करी क्षमता आणि तांत्रिक सामर्थ्य या प्रदेशात स्थिरता आणणारी शक्ती ठरू शकते, असा अमेरिकेचा विश्वास आहे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान त्यांनी प्रामुख्याने भारताचा उल्लेख करत म्हटले की, चीन इंडो-पॅसिफिक क्षेत्रात आक्रमक वृत्ती स्वीकारत आहे आणि बेकायदेशीरपणे आपली सागरी क्षमता वाढवत आहे. ते म्हणाले, चीन भारताच्या सीमेवर आपली भूमिका कडक करत आहे.

अमेरिका आपल्या मित्रांसोबत उभी
अमेरिकेचे संरक्षण मंत्री म्हणाले, चीन तैवानला आपला भाग मानतो. याशिवाय इतर देशांच्या काही भागांवरही तो आपला दावा करत आहे आणि त्यासाठी आक्रमक दृष्टिकोनही अवलंबत आहे. ऑस्टिन म्हणाले, चीन दक्षिण चीन समुद्रात आक्रमक आणि बेकायदेशीर दृष्टिकोन घेत आहे. अशा परिस्थितीत अमेरिका आपल्या मित्र राष्ट्रांच्या पाठीशी उभी आहे. ते म्हणाले, आम्ही आमच्या परस्पर संरक्षण वचनबद्धतेवर कायम आहोत.

अमेरिका भविष्यातील आक्रमण थांबवण्यास तयार
अमेरिकेचे संरक्षण मंत्री म्हणाले, चीन आक्रमक वृत्ती स्वीकारत आहे. त्याचे भारतासोबत सीमा विवाद देखील आहेत आणि लडाख सेक्टरमध्ये आक्रमक भूमिका घेत आहे. याशिवाय व्हिएतनाम, तैवान, फिलीपिन्स, ब्रुनेई, मलेशियाच्या काही भागांवरही ते दावा करत आहेत. अशा स्थितीत भविष्यातील आक्रमण रोखण्यासाठी आणि पराभूत करण्यासाठी अमेरिका पूर्णपणे सज्ज आहे. आम्ही आमच्या मित्रांसोबत उभे आहोत आणि आमची सुरक्षा पायाभूत सुविधा पारदर्शक आणि अधिक समावेशक बनवण्यासाठी एकत्र काम करत आहोत, असेही ते म्हणाले.