Prophet Remarks Row : ‘नूपूरला फाशी द्यावी’, AIMIM खासदाराची मागणी, ओवेसींच्या पक्षाला करावे लागले डॅमेज कंट्रोल


औरंगाबाद – एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नुपूर शर्मा यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पक्षाकडून जोरदार वक्तव्य जारी करण्यात आले आहे. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर पक्षाने ट्विट करून नुपूर शर्माच्या अटकेची आणि वेळीच कारवाईची मागणी केली आहे.

खरे तर औरंगाबादचे लोकसभा खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी नुपूर शर्मा यांना मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल फाशीची शिक्षा द्यावी, असे म्हटले होते. अशा गोष्टी सहज सोडल्या तर थांबणार नाहीत. कोणत्याही जात, धर्म किंवा पंथाच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायदा आणला पाहिजे, असे ते म्हणाले. भाजपवर आरोप करताना ते म्हणाले, नुपूर शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही कसली वृती आहे? वेळीच कारवाई होत नाही, त्यामुळे अशी कृत्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

अनेक ठिकाणी हिंसाचार
नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी विशिष्ट समुदायाच्या लोकांनी निषेध केला. यादरम्यान अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनाही घडल्या. उत्तर प्रदेशात सहा जिल्ह्यांतील 130 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. प्रयागराज आणि सहारनपूरमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. प्रयागराजमध्ये काही मोटारसायकल आणि वाहने जाळण्यात आली आणि पोलिसांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

भाजपने केली हकालपट्टी
वास्तविक, भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. हे या आंदोलनाचे प्रमुख कारण आहे. नुपूरच्या वक्तव्यानंतर 15 हून अधिक अरब देशही संतापले होते. अनेक ठिकाणी भारतीय उत्पादनांचा वापर बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर भारत सरकारने कठोर पावले उचलत नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला.