मुंबई – आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत रात्रभर पावसानंतर हवामान खात्याने नैऋत्य मान्सूनचे येथे आगमन झाल्याचे जाहीर केले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कुलाबा येथे गेल्या 24 तासांत 61.8 मिमी, तर सांताक्रूझमध्ये 41.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Monsoon in Mumbai : मुंबईत मान्सूनचे आगमण, वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली
हवामान खात्याने दिली मोठी माहिती
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, कोकणातील बहुतांश भाग (मुंबईसह), मध्य महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकच्या काही भागात पुढे सरकला आहे. उत्तर अरबी समुद्राचा आणखी काही भाग, गुजरात राज्य, मराठवाडा, तेलंगणाचा आणखी काही भाग, आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागात मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
मान्सूनने 29 मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर पहिल्यांदा दिली धडक
विशेष म्हणजे, देशातील वार्षिक पावसापैकी 70 टक्के पाऊस हा मान्सून वाऱ्यांमुळे येतो आणि तो कृषी आधारित अर्थव्यवस्थेसाठी जीवनरेखा मानला जातो. हवामान खात्याचे शास्त्रज्ञ आर. के. जेनामनी म्हणाले की, मान्सूनने 29 मे रोजी केरळ किनारपट्टीवर हजेरी लावली आणि 31 मे ते 7 जून दरम्यान तो दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, संपूर्ण केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भाग व्यापेल.
जोरदार वादळ आणि पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला
दरम्यान नाशिकमध्ये सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये एका ऑटोवर दोन मोठी झाडे पडल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर चालक आणि त्यात उपस्थित असलेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला. अन्य दोन प्रवासी जखमी झाले.