मोदींनी घेतली शाळेतील आपल्या गुरूंची भेट
गुजराथच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी नवसारी येथे त्यांच्या शाळेतील गुरूंची भेट घेतल्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या फोटो मध्ये मोदी आपल्या शिक्षकांना दोन्ही हात जोडून नमस्कार करताना दिसत आहेत तर शिक्षक श्री. जगदीश नाईक हे आपल्या शिष्याच्या डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद देताना दिसत आहेत.
या भेटीमुळे श्री. जगदीश नाईक अतिशय भावूक झाले. ते म्हणाले, ‘ हा माझ्या जीवनातला सर्वात सुखाचा क्षण आहे. आपण ज्याला शिकविले, तो विद्यार्थी देशाचा पंतप्रधान होणे या सारखा आनंद हा कोणत्याही शिक्षकासाठी फार मोठा क्षण आहे. आज त्यांच्या खांद्यावर देशाची जबाबदारी आहे पण त्यांना आपल्या पदाचा गर्व नाही. अन्यथा असा कुठला विद्यार्थी आपल्या शाळेतील शिक्षकाच्या भेटीसाठी येतो?’
पंतप्रधान मोदी नवसारी जिल्ह्यात ३०५० कोटींच्या विकास योजनेचे उद्घाटन करण्यासाठी गुजराथ दौऱ्यावर आले आहेत. अहमदाबाद येथे मोदींच्या हस्ते इस्रोच्या नव्या भावनाचे उद्घाटन यावेळी केले गेले त्यावेळी गृहमंत्री अमित शहा हेही उपस्थित होते.