अलीकडेच सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते, ज्यामध्ये सलमानचे सिद्धू मूसवालाप्रमाणे हाल करु, असे म्हटले होते. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अलीकडेच लॉरेन्स बिश्नोईच्या धर्मा भाईने सलमान खान हे आपले पुढचे लक्ष्य असल्याचे म्हटले आहे. काळवीट मारल्याबद्दल सलमान खानने माफी मागितली, तर तो त्याला वाचवेल.
सलमानच्या हत्येच्या कटाचे सत्य वाचून बसेल धक्का, लॉरेन्सचा भाऊ म्हणाला- त्याने फक्त माफी मागावी…
एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा लॉरेन्स बिश्नोईचा मेहुणा राजवीर सोपूला सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर त्याच्या पुढील लक्ष्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने थेट सलमान खानचे नाव घेतले. राजवीर सोपू म्हणाला, सलमान खानने काळवीट मारले असून आज तो सर्व खटल्यातून निर्दोष सुटला आहे. हरणांना मारून त्याने मोठी चूक केली आहे. भविष्यात सलमानचे काम आम्ही करू, असे आम्ही उघडपणे सांगत आहोत, त्यात कोणताही ट्विस्ट नाही.
यानंतर जेव्हा राजवीर सोपूची मुलाखत घेणाऱ्याने तू माझ्या मुलासारखा आहेस, स्वतः जगा आणि लोकांनाही जगू द्या, असे सांगितले. यावर राजवीर म्हणाला, तुम्हाला वचन देतो सलमानचे काम करेन, त्यानंतर एकही काम करणार नाही. त्याचवेळी त्याने सांगितले की, सलमानने आपली चूक कधीच मान्य केली नाही, फक्त एक मुलाखत दिली. त्याने चूक मान्य केली असती, तर माफ केले असते. सलमानने हे पाहनू आता माफी मागावी, असे राजवीरला सांगण्यात आले. यावर राजवीर म्हणाला की, सलमानने माफी मागितली, तर त्याची सुटका होईल.
दोन दिवसांपूर्वी सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. त्याचवेळी चार वर्षांपूर्वी लॉरेन्स बिश्नोईनेही सलमान खानला मारण्याची घोषणा केली होती. सलमान जेव्हाही जोधपूरला येईल, तेव्हा त्याला मारून टाकू, असे तो म्हणाला होता. लॉरेन्स सध्या तुरुंगात आहे, परंतु त्याचे गुंड सर्वत्र आहेत. अशा परिस्थितीत सलमान खानचा धोका वाढला असून मुंबई पोलीस त्याच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त करत आहेत.