Prophet row: नुपूर, शादाब, पूजासह या लोकांवर गुन्हा दाखल, प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई


नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने कथितपणे द्वेषाचे संदेश पसरवणाऱ्या, विविध गटांना भडकावणे आणि सार्वजनिक शांततेला हानी पोहोचवणारी परिस्थिती निर्माण करणाऱ्यांविरुद्ध विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दिल्ली पोलिसांनी ज्या लोकांविरुद्ध प्रक्षोभक संदेशाद्वारे द्वेष पसरवण्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये नुपूर शर्मा, नवीन कुमार जिंदाल, शादाब चौहान, सबा नक्वी, मौलाना मुफ्ती नदीम, अब्दुर रहमान, गुलजार अन्सारी, अनिल कुमार मीना, पूजा शकुनच्या यांच्या नावाचा समावेश आहे.

प्रक्षोभक वक्तव्यासाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) मधून निलंबित, माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मंगळवारी सांगितले की ती पक्षाच्या निर्णयाचा स्वीकार करते आणि त्याचा आदर करते.

मोहम्मद पैगंबर यांच्यावरील कथित वादग्रस्त वक्तव्यावरून मुस्लिम देशांच्या विरोधानंतर भाजपने राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि दिल्ली युनिटचे सोशल मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांना पक्षातून निलंबित केले होते. निलंबनावर ती म्हणाली, मी व्यावहारिकदृष्ट्या संघटनेत मोठी झाली आहे. मी त्यांचा निर्णय स्वीकारते आणि त्याचा आदर करते.

मुस्लिम संघटनांचा विरोध आणि कुवेत, कतार आणि इराणसारख्या देशांकडून तीव्र प्रतिक्रिया असताना, भाजपने रविवारी आपल्या नेत्यांना निलंबित करण्यापूर्वी एक निवेदन जारी केले होते, त्यात म्हटले होते की ते सर्व धर्मांचा आदर करतात आणि कोणत्याही धार्मिक व्यक्तिमत्त्वाचा अपमान करत नाही. अशा वक्तव्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो.

दुसरीकडे, मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या पक्षाच्या दिल्ली युनिटचे माजी सोशल मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनी मंगळवारी दावा केला की त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. जिंदाल यांनी 1 जून रोजी मोहम्मद साहब यांच्यावर वादग्रस्त ट्विट केले होते, त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला जात होता.