मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईतील वांद्रे परिसरात गुरुवारी रात्री उशिरा तीन मजली निवासी इमारत कोसळून एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही तीन ते चार जण दबले असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Mumbai Building Collapse: मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे दोन मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू, तर 16 हून अधिक जखमी
रात्री उशिरा 12.30 वाजताची घटना
पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील महाराष्ट्र नगर परिसरात रात्री 12.30 वाजता ग्राउंड प्लस दुमजली इमारत कोसळली, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर तेथे गोंधळ उडाला. माहिती मिळताच बचाव बचाव पथकाला तेथे पाठवण्यात आले.
भाभा रुग्णालयात जखमींवर उपचार
घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल, पोलीस आणि वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून जखमींवर जवळच्या भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.