आयपीएलच्या धर्तीवर प्रथमच टेबल टेनिस लीगचे आयोजन

देशात लोकप्रिय ठरलेल्या क्रिकेटच्या आयपीएल स्पर्धेच्या धर्तीवर प्रथमच टेबल टेनिस लीगचे आयोजन केले जात असून यासाठी टेबल टेनिस खेळाडूंचे लिलाव केले गेले आहेत. त्यात गुजराथचा मानुष शहा हा सर्वाधिक महाग पुरुष खेळाडू ठरला तर तेलंगणाची श्रीया अकुला ही सर्वात महाग महिला खेळाडू ठरली. गुजराथ स्टेट टेबल टेनिस असोसीएशन आयोजित गुजराथ सुपर लीग जून २०२२ च्या शेवटी अहमदाबाद येथे पार पडणार आहे.

बडोद्याच्या डावखुऱ्या मानुष शहाची बेस प्राईज ३० हजार रुपये होती त्याला आणंदच्या टॉपनॉच अचिव्हर्स ने १.११ लाखात खरेदी केले. तेलंगणाच्या श्रीजा अकुलाची बेस प्राईज पण ३० हजारच होती तिला भयानी स्टार्स ने ९६ हजारात खरेदी केले. या लीगच्या पहिल्या सिझन मध्ये आठ संघ असून प्रत्येक फ्रेंचाईजी कडे २.७५ लाखाची पर्स आहे. प्रत्येक टीम जास्तीत जास्त सात खेळाडू खरेदी करू शकणार आहे.

भयानी स्टार्स, कटारिया किंग्स, मल्टीवेट मार्व्हल्स या अहमदाबादच्या फ्रांचाईजी आहेत. द वर्ड रॉयल, गांधीनगर, शामल स्क्वाड, ताप्ती टायगर्स सुरतच्या तर टॉपनॉच अचिव्हर्स आणंदची आणि विन एशिया डॅझलर्स कच्छ येथील फ्रेंचाईजी आहे.