महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, 10 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण


मुंबई – नुकताच महाराष्ट्र बोर्डाच्या 12वीचा निकाल जाहीर झाला असून जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, यंदा 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 10 हजारांहून अधिक आहे. यासोबतच उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठीही अर्ज करता येणार आहे. गुणांबाबत असमाधानी असलेले विद्यार्थी त्यांच्या प्रतींची पडताळणी करू शकतील.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे यांनी आज, 8 जून 2022 रोजी राज्यातील संलग्न शाळांमधील 2021-22 या वर्षातील इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल 2022 जाहीर केला आहे. महाराष्ट्र 12वी 2022 चा निकाल आज सकाळी 11 वाजता जाहीर झाला. यासह, बोर्डाने शेअर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, यावर्षीच्या परीक्षेत 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.