नवी दिल्ली : नागरी विमान वाहतूक महासंचालक (DGCA) ने कोरोना संसर्ग लक्षात घेऊन विमानतळांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजीसीएने नवीन नियम जारी केले आहेत.
DGCA New Covid Norms: विमानतळ आणि विमानांमध्ये मास्क लावणे पुन्हा बंधनकारक, कोविड संसर्ग वाढण्याबाबत DGCA ने लागू केले नवीन नियम
नवीन नियमांमध्ये, DGCA ने हवाई प्रवासादरम्यान मास्क अनिवार्य केले आहेत. आता केवळ अपवादात्मक परिस्थितीतच मास्क काढण्याची परवानगी दिली जाईल. यासोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, उल्लंघन करणाऱ्यांना ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकले जाऊ शकते.