Jubilee Hills Gang-rape Case: हैदराबादच्या भाजप आमदारावर गुन्हा दाखल, बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याचा आरोप


हैदराबाद: तेलंगणाच्या हैदराबाद पोलिसांनी ज्युबली हिल्समधील 17 वर्षीय सामूहिक बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे आमदार रघुनंदन राव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन पीडितेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रसिद्ध केल्याप्रकरणी राव यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या 228A (पीडित व्यक्तीची ओळख उघड करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

6 जून रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, फिर्यादीने आरोप केला आहे की, 4 जून रोजी तेलंगणा राज्यातील दुबक मतदारसंघाचे आमदार माधवनेनी रघुनंदन राव यांनी भाजप प्रदेश कार्यालय, कट्टेलमंडी येथे एका किशोरवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराशी संबंधित पत्रकार परिषदेला संबोधित केले. रघुनंदन राव यांनी या घटनेशी संबंधित छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारमाध्यमांसमोर जारी केले, ज्या दरम्यान अल्पवयीन पीडितेची ओळख उघड झाली.