IT Portal : प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटमध्ये पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड, या विशेष फीचरने काम करणे थांबवले


नवी दिल्ली – आयकर विभागाच्या वेबसाईटमध्ये पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड दिसून आला आहे. वेबसाइटचे सर्च फिचर काम करत नसल्याच्या अनेक तक्रारी मंगळवारी विभागाला मिळाल्या. या समस्येची माहिती आयकर विभागाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

विभागाने केलेल्या ट्विटमध्ये असे सांगण्यात आले की, वेबसाईटमध्ये सर्च ऑप्शनशी संबंधित एक समस्या समोर आली आहे. या समस्येचे निराकरण केले जात आहे आणि आयटी कंपनी इन्फोसिसला याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर इन्फोसिसनेही ही समस्या प्राधान्याने सोडवत असल्याचे सांगितले आहे.

विशेष म्हणजे, 7 जून 2021 रोजी, एक नवीन आयकर पोर्टल गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आले होते, जे देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने तयार केले होते. ते सुरू झाल्यानंतर त्यात तांत्रिक अडचणीच्या तक्रारी येऊ लागल्या. आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 निश्चित करण्यात आली आहे. ज्या करदात्यांना ऑडिटची गरज आहे, त्यांच्यासाठी ही तारीख 31 ऑक्टोबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.