Flight 914 Mystery : बेपत्ता होऊन 30 वर्षांनंतर लँड झाले हे विमान, जाणून घ्या काय आहे यामागील रहस्य


जग रहस्यांनी भरलेले आहे, परंतु अशी काही रहस्ये आहते, जी समजणे खूप कठीण आहे. जगभरात अशी अनेक रहस्ये आहेत, ज्यांचे गूढ वैज्ञानिकही आजपर्यंत सोडवू शकलेले नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गुपिताबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल. यासोबतच या गुपितावर विश्वास ठेवणेही अशक्य वाटते. या रहस्यामुळे जगातील मोठमोठे वैज्ञानिकही अचंबित झाले होते.

अशीच एक रहस्यमय घटना सुमारे 67 वर्षांपूर्वी 1955 मध्ये घडली होती. ही घटना एका रहस्यमय यूएस विमानाशी संबंधित आहे, जे टेक ऑफ केल्यानंतर जवळपास 30 वर्षांनी दुसऱ्या देशात उतरले. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे हे विमान लँडिंग केल्यानंतर पुन्हा गायब झाले. जाणून घेऊया या रहस्यमय घटनेबद्दल…

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की 2 जुलै 1955 रोजी फ्लाइट 914 ने यूएसमधील न्यूयॉर्कहून मियामीला एकूण 57 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्ससह उड्डाण केले. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे न्यूयॉर्कहून उड्डाण घेतल्यानंतर आणि मियामीला पोहोचण्यापूर्वी हे विमान आकाशात गायब झाले. त्या काळात अमेरिकेने या जहाजाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

सध्या न्यूयॉर्कहून मियामीला विमानाने जाण्यास साडेतीन तास लागतात. 1955 मध्ये, न्यूयॉर्क ते मियामी उड्डाण करण्यासाठी जास्तीत जास्त पाच तास लागत होते.

त्यावेळी 1955 मध्ये बेपत्ता झालेले विमान ‘फ्लाइट 914’ 30 वर्षांनंतर 9 मार्च 1985 रोजी व्हेनेझुएलामधील कराकस विमानतळावर रहस्यमयरित्या लँड झाले, तेव्हा अवघे जग थक्क झाले होते. एअर ट्रॅफिक कंट्रोलकडेही या विमानाबाबत कोणतीही माहिती नव्हती. लँडिंगनंतर काही वेळातच विमानाने पुन्हा उड्डाण केले आणि आकाशात गायब झाले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कराकस विमानतळावर विमान लँडिंग केल्यानंतर पायलटने तेथील कर्मचाऱ्यांना विचारले की, हे कोणते वर्ष आहे? ग्राउंड स्टाफने पायलटला सांगितले की ते 1985 आहे. हे ऐकून विमानाचे पायलट दीर्घ श्वास घेऊ लागले आणि म्हणाले, ‘अरे! अरे देवा’. यानंतर विमानाने पुन्हा एकदा उड्डाण केले आणि आकाशात गायब झाले.

पण या रहस्यात कितपत तथ्य आहे, हे सांगणे फार कठीण आहे, पण 9 मार्च 1985 पासून या बेपत्ता विमानाबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. या बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी अमेरिका अजूनही प्रयत्न करत आहे.