गोव्यात समुद्रकिनारी ब्रिटिश महिलेवर बलात्कार, आरोपी तरुणाला अटक


पणजी : उत्तर गोव्यातील आरंबोल समुद्रकिनाऱ्याजवळ एका ब्रिटिश महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी सोमवारी एका ३२ वर्षीय व्यक्तीला अटक केली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ब्रिटिश महिलेने आरोप केला आहे की स्थानिक रहिवासी जोएल व्हिन्सेंट डिसूझा याने 2 जून रोजी समुद्रकिनाऱ्यावर तिच्यावर बलात्कार केला.

आपल्या पतीसोबत गोव्याला भेट देण्यासाठी आली होती ब्रिटीश महिला
ब्रिटीश महिलेने सांगितले की, ती तिच्या पतीसोबत गोव्यात आली होती आणि समुद्राच्या परिसरात हॉटेलमध्ये राहात होती. पण संध्याकाळी तिला समुद्रकिनारी जावेसे वाटले, मग ती समुद्र किनारी गेली आणि तिचा नवरा तिथे हॉटेलमध्ये थांबला होता. ती समुद्रकिनारी आराम करत असताना तरुणाने तिच्यावर बलात्कार केला.

आरोपींना अटक
पतीसोबत गोवा दौऱ्यावर असलेल्या पीडितेने सोमवारी सायंकाळीच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.