Imran Khan Arrest: अजून फक्त 14 दिवस… इम्रान खान यांना होणार अटक, दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल


इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना लवकरच अटक होणार आहे. शाहबाज सरकारमधील गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी ही माहिती दिली आहे. इम्रान खानला 2 जून रोजी तीन आठवड्यांसाठी ट्रान्झिट जामीन मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा जामीन 23 तारखेला संपत असून, त्यानंतर त्यांना अटक करण्यात येईल. मात्र, गृहमंत्र्यांच्या या दाव्यात काही तथ्य आहे का, हे पाहायचे आहे. 2 जून रोजी, पेशावर उच्च न्यायालयाने (PHC) इम्रान खान यांना 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर तीन आठवड्यांचा ट्रान्झिट जामीन मंजूर केला होता.

इम्रान खानवर दाखल आहेत दोन डझनहून अधिक गुन्हे
द न्यूज इंटरनॅशनलने मंत्री राणा सनाउल्लाला यांच्या हवाल्याने सांगितले आहे की, इम्रान खान यांच्यावर दंगल, देशद्रोह, महासंघात अराजकता पसरवणे अशा प्रकारचे दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. मंत्री म्हणाले की, इम्रान खानच्या बनी गाला निवासस्थानाबाहेर तैनात सुरक्षा अधिकारी न्यायालयाने दिलेल्या संरक्षणात्मक जामिनाची मुदत संपल्यानंतर त्यांना अटक करतील.

लोकांना भडकावणारा कसा होऊ शकतो पक्षाचा प्रमुख : सनाउल्लाह
आपल्या विरोधकांना देशद्रोही ठरवून लोकांना भडकवणाऱ्या आणि नैतिक आणि लोकशाही मूल्यांचा पूर्णपणे अवहेलना करणाऱ्या लोकशाही समाजात कोणी राजकीय पक्षाचा प्रमुख कसा बनू शकतो?

कायद्यानुसार पुरवली जात आहे इम्रान खान यांना सुरक्षा : राणा सनाउल्लाह
गृहमंत्र्यांनी सांगितले की, ते इम्रान खानचे इस्लामाबादमध्ये स्वागत करतात आणि त्यांना कायद्यानुसार सुरक्षा पुरवली जात आहे. शनिवारी रात्री उशिरा इस्लामाबाद पोलिसांनी सांगितले की, इम्रान खान पेशावरहून इस्लामाबादला परतण्याची शक्यता लक्षात घेऊन बनी गालाच्या आसपास सुरक्षा वाढवण्यात आली आहे.