नदाल १४ व्यांदा फ्रेंच ओपन विजेता
किंग ऑफ क्ले असे बिरूद असलेला स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने फ्रेंच ओपन चँपियनशिप २०२२ मध्ये विजेतेपद मिळवून या वर्षातील दुसरे ग्रँडस्लॅम जिंकले आहे. या पूर्वी त्याने ऑस्टेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे. त्याचे हे पुरुष एकेरीतील २२ वे ग्रँड स्लॅम असून तो सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे ३६ व्या वर्षात फ्रेंच ओपन जिंकून त्याने ही स्पर्धा सर्वात मोठ्या वयात जिंकण्याचा इतिहास रचला आहे.
पाचवे मानांकन असलेल्या नदालने नॉर्वेच्या कॅस्पर रूड याला ६-३,६-३,६-० असे सरळ तीन सेट जिंकून हरविले. आजपर्यंत नदाल फ्रेंच ओपनचा अंतिम फेरीतील एकही सामना हरलेला नाही आणि यामुळेच त्याला ‘किंग ऑफ क्ले’ असे बिरूद मिळाले आहे. फ्रेंच ओपन, क्ले म्हणजे मातीच्या मैदानावर होणारी स्पर्धा आहे. या अगोदर ५० वर्षापूर्वी आंद्रे गीमेनो याने ३४ व्या वर्षी ही स्पर्धा जिंकून सर्वाधिक वयाचा स्पर्धा जिंकणारा खेळाडू असे रेकॉर्ड केले होते. नदालने ३६ व्या वर्षी ही स्पर्धा जिंकून त्याचे रेकॉर्ड मोडले आहे. नदालने त्याच्या कारकिर्दीत एकूण ९२ सिंगल टायटल्स जिंकली आहेत.