तुम्हाला जर केवळ खाण्यासाठी पैसे दिले तर ? नक्कीच हे एखाद्या ड्रीम जॉब पेक्षा कमी नसेल. लोकप्रिय युट्यूबर फॅबिओ मॅटिसनसाठी मात्र हे एखाद्या नोकरी पेक्षा अधिक आहे.
चक्क खाण्याचे पैसे घेते ही युट्यूबर
युकेमधील 28 वर्षीय फॅबिओ मॅटिसनला केवळ खाण्यासाठी पैसे मिळतात. आता फॅबिओ देखील मकबँग क्रेझमध्ये सहभागी झाली आहे. मकबँग क्रेझ हा ट्रेंड 2010 मध्ये दक्षिण कोरियात खूपच लोकप्रिय झाला होता. या ट्रेंडमध्ये खातानाचा व्हिडीओ काढला जातो व प्रेक्षकांशी संवाद साधतात.
फॅबिओने आपला पहिला व्हिडीओ 2018 मध्ये काढला होता. तिला तो अनुभव खूपच आवडला.
फॅबिओने सांगितले की, हजारो लोक मला खातानी पाहतात यामुळे मला अधिक आनंद होतो. तिने सांगितले की, 19 वर्षांची असल्यापासून मला जेवताना काळजी वाटत असे. मला सतत वजन वाढण्याची आणि लोक मला खाताना पाहत आहेत याची असुरक्षितता वाटत असे.
फॅबिओनुसार, मकबँगचे व्हिडीओ बघितल्यानंतर अन्न हे नक्कीच एवढे खतरनाक नाही असे तिला वाटू लागले. त्यानंतर तिने व्हिडीओ बनवण्याचा निर्णय घेतला.
फॅबिओ मॅटिसनचे आज यूट्यूबवर 8 हजारांपेक्षा अधिक स्बस्क्राईर्ब्स आहेत. बर्गर, चॉकलेट केक, चीप खातानाच्या तिच्या व्हिडीओ हजारो व्यूज मिळत आहे. विशेष म्हणजे याद्वारे ती पैसे देखील कमवत आहे. फॅबिओ जून 2018 पासून यूट्यूबवर व्हिडीओ शेअर करत असून, तिने आतापर्यंत 200 व्हिडीओ अपलोड केले आहेत.