जेट निर्माता कंपनी गल्फस्ट्रीम पुन्हा एकदा ‘जगातील सर्वात मोठे खाजगी जेट’ हा किताब आपल्या नावावर करण्यासाठी तयार आहे. कपंनीने फ्लॅगशीप जी650 चे व्हर्जन बनवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मागील वर्षी बॉम्बार्डियर कंपनीने ग्लोबल 7500 हे सर्वात मोठे खाजगी जेट बनवले होते. आता ग्लोबल 7500 मागे टाकत पुन्हा एकदा गल्फस्ट्रीम हा किताब आपल्या नावावर करण्याच्या तयारीत आहे.
तब्बल 76 मिलियन डॉलर खर्च करून बनणार जगातील सर्वात मोठे खाजगी जेट
गल्फस्ट्रीमचे जी700 हे जेट 2022 पर्यंत तयार होईल. या जेटमध्ये 7500 नौटिकल माईलने उड्डाण घेण्याची क्षमता असेल.
गल्फस्ट्रीमचे अध्यक्ष मार्क बर्नस यांनी सांगितले की, जी 700 मध्ये आमच्या इंडस्ट्रीतील सर्वात मोठे, रूंद आणि लांब कॅबिन असेल. 76 मिलियन डॉलरचे हे जी700 खाजगी जेट जगातील अनेक फ्लायर्सला आकर्षित करेल.
तर दुसरीकडे ग्लोबल 7500 ची डिलिव्हरी डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहे. योजनेनंतर दोन वर्षांनी हे जेट बाजारात येणार आहे. बॉम्बार्डियरचे अध्यक्ष डेव्हिड कोलेल म्हणाले की, यात नवीन डिझाईन आहे व इतरांच्या तुलनेत सर्वोत्तम परफॉर्म करण्यासाठी बनवण्यात आले आहे. या जेटची किंमत 73 मिलियन डॉलर आहे.