जाणून घ्या ब्रिटिश राजघराण्यातील या विचित्र नियमांबद्दल

ब्रिटनचे राजघराणे हे जगातील सर्वात चर्चित कुटुंब आहे. महाराणी एलिजाबेथ-द्वितीय, मुले-सून, नातू यांच्याशिवाय राणीचे जवळचे नातेवाईक हे या राजघराण्याचे सदस्य आहेत.

या परिवाराचे नाव आले की, आपोआपच त्यांचे राहणीमान, संपत्ती या गोष्टींचा उल्लेख होतो. मात्र सर्वात जास्त चर्चा होते ते म्हणजे या राजघराण्यासंबंधी असलेले काही विचित्र नियम. हे नियम सर्वांनाच मान्य करावे लागतात. आज आम्ही तुम्हाला राजघराण्यासंबंधीत असेच काही नियम सांगणार आहोत.

(Source)

 • जर राणी उभी असेल तर आजुबाजूच्या इतर सदस्यांना देखील उभे राहावे लागते.
 • जर तुम्ही राणीबरोबर जेवण करत असाल तर राणीने शेवटचा घास खाल्यानंतर तेथे उपस्थित कोणीही व्यक्ती जेवू शकत नाही.
 • राणीला अभिवादन करताना राजघराण्यातील पुरूषाला मान झुकवावी लागते. तर महिलांना थोडे वाकून सन्मान द्यावा लागतो.

(Source)

कुटुंबातील दोन वारसदार सोबत प्रवास करू शकत नाही. म्हणजेच मुलगा देखील आपल्या वडिलांबरोबर प्रवास करू शकत नाही. हा नियम राजघराण्याच्या उत्तराधिकाऱ्याच्या सुरक्षेसाठी बनवण्यात आला आहे.  काही दिवसांपुर्वी प्रिन्स विलियम आणि केटने हा नियम तोडत मुलाबरोबर प्रवास केला होता.

(Source)

राजघराण्यातील केवळ विवाहित महिलाच टियारा (मुकूट) घालू शकतात. संध्याकाळी 6 नंतर राजघराण्यातील विवाहित महिला कार्यक्रमात सहभागी झाल्यास हॅट काढून टियारा घालावा लागतो.

(Source)

ब्रिटिश राजघराण्यात शेलफिश आणि लसून खाण्यास मनाई आहे. शेलफिM खाण्यास मनाई आहे कारण यामुळे एलर्जी आणि विषबाधा होऊ शकते. लसून राणी एलिजाबेथला आवड नाही त्यामुळे खाण्यास मनाई आहे.

एवढेच नाही तर चहा आणि कॉफी पिण्याची देखील एक ठराविक पध्दत आहे. कपाचे हँडल पकडण्यासाठी राजघराण्यातील सदस्य आपल्या हाताचा अंगठा आणि तर्जनीचा (इंडेक्स फिंगर) वापर करतात. तर मधल्या बोटाचा वापर कपाला खालून आधार देण्यासाठी देतात.

(Source)

जेवताना राजघराण्यातील कुटूंब चाकू नेहमी डाव्या हातात आणि फॉर्क उजव्या हातात पकडतात. खाण्याचा तुकडा काट्यामध्ये अडकवण्याऐवजी काट्याच्या मागे ठेवतात व खातात.

(Source)

 • सार्वजनिक ठिकाणी राजघराण्यातील पती-पत्नी एकमेंकाचा हात पकडणे टाळतात.
 • सदस्यांना लग्नासाठी सर्वात आधी राणीची परवानगी घ्यावी लागते. राजघराण्यातील वधू आपल्या बाँकेटमध्ये मेंहदी नक्की ठेवते.

(Source)

 • राजघराण्यातील सदस्य कोणतीही विचारधारा ठेऊ शकत नाही. सार्वजनिक ठिकाणी राजकीय विषयावर बोलू शकत नाही. तसेच कोणतेही राजकीय पद देखील स्विकारू शकत नाही.
 • राजघराण्यातील सदस्य कोणाला ऑटोग्राफ आणि सेल्फी देखील देऊ शकत नाही.
 • सदस्यांना कुठल्याही प्रकारच्या भेटवस्तू स्विकाराव्याच लागतात.

(Source)

 • डिनर पार्टीमध्ये राणी सर्वात प्रथम डाव्या बाजूला बसलेल्या व्यक्तीशी चर्चा करते. त्यानंतर उजव्या बाजूला बसलेल्या व्यक्तीशी संवाद साधते.
 • राणीने जेवणात बटाटा, पास्ता आणि भात या गोष्टींवर देखील बंदी घातली आहे.
 • राणीशी चर्चा केल्यानंतर तुम्ही पाठ दाखवून परत जाऊ शकत नाही. आधी राणी त्या ठिकाणावरून जाईल.

(Source)

 • सदस्यांना वेगवेगळ्या भाषा शिकाव्या लागतात. प्रिंस जॉर्जने देखील लहानपणासापून इंग्रजीबरोबर स्पॅनिश शिकण्यास सुरूवात केली होती.
 • राणी एलिजाबेथ ब्राइट आणि नियॉन रंगाचे कपडे घालण्यासाठी ओळखली जाते. जेणेकरून गर्दीमध्ये देखील राणीची सहज ओळख पटेल.
 • महिलांना नेहमी पाय एकमेंकावर क्रॉस ठेऊन बसावे लागते.

(Source)

राणी आपल्या कर्मचाऱ्यांना काही सिग्नल देण्यासाठी हँडबॅगचा वापर करते. जर राणीने पर्स डाव्या हातातून उजव्या हातात घेतली तर याचा अर्थ होतो की, राणीला ती चर्चा संपवायची आहे.

जर डिनरच्या आत राणीने पर्स टेबलवर ठेवली तर पाच मिनिटाच्या आत जेवण संपवणे गरजेचे आहे.

(Source)

ब्रिटनमध्ये विना नंबर प्लेट आणि लायसन्सचे गाडी चालवण्याचा अधिकार केवळ राणीकडे आहे. राणीचे पती प्रिन्स फिलिप यांना राणीपेक्षा नेहमी काही पावले मागे चालावे लागते. हा नियम त्यांच्या लग्नापासून आहे.

Leave a Comment